शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

नवीन मोटार वाहन कायद्याबाबत पोलिसांनी झळकविले फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:45 PM

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपविल्यास आणि दुर्दैवाने त्याच्याकडून अपघात घडल्यास संबंधित मुलाच्या पालकांना....

ठळक मुद्देशहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारले जाणार फलक मोटार वाहन कायद्यात नव्याने काही तरतुदीनाशिककरांमध्ये जागरूकता यावी, यासाठी प्रबोधनपर फलक

नाशिक : शहर वाहतूक शाखेकडून नवीन मोटार वाहन सुधारित कायद्याविषयक जनजागृती करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरूवात करण्यात आली. बुधवारी (दि.४) आडगाव येथील क.का.वाघ महाविद्यालयाजवळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जनजागृतीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. नवीन मोटार वाहन कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये अशाप्रकारे फलक उभारले जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.मोटार वाहन कायद्यात नव्याने काही तरतुदी करण्यात आल्या असून, या कायद्याची अंमलबजावणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पुर्वी नाशिककरांमध्ये याविषयी जागरूकता यावी, यासाठी प्रबोधनपर फलक उभारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून वाहनचालक वाहतूक नियमांचे अधिकाधिक पालन करण्यावर भर देतील, हा यामागील उद्देश आहे. ‘वाहतूक नियमांचे पालन करा, आपले पैसे वाचवा, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर आहे’ असा संदेश आणि दंडाच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपविल्यास आणि दुर्दैवाने त्याच्याकडून अपघात घडल्यास संबंधित मुलाच्या पालकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. तसेच आपत्कालीन स्थितीत धावणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन बंबाला रस्ता मोकळा करून न दिल्यास १० हजारांचा दंडदेखील पोलिसांकडून केला जाऊ शकतो. नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये काही तरतुदींनुसार शिक्षा कडक करण्यात आली आहे. दंडाच्या रकमेतदेखील वाढ झाली असून, या कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटीफिकेशन शहर वाहतूक शाखा लवकरच जाहीर करणार आहे. तत्पुर्वी फलक याबाबत जनजागृतीसाठी फलक उभारले जात आहेत तसेच नादुरुस्त वाहने रस्त्यावर आणल्यास त्या इसमालाही १० हजारांचा दंड पोलिसांकडून केला जाऊ शकतो. बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहने दामटविल्यास सदर चालकावर पोलिसांकडून कारवाई करत दोन हजारांपर्यंतचा दंड वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे आता यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. फलक अनावरणप्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांच्यासह वाहूतक पोलीस, विद्यार्थी उपस्थित होते.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस