सातपूर : सायबर गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी व माथाडी संबंधातील अपप्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी व गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनास कळवाव्यात, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.निमात आयोजित बैठकीत उद्योजकांशी संवाद साधताना आयुक्त नांगरे पाटील यांनी सांगितले की, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, मोठ्या कंपन्यांमार्फत सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी निमाने पाठपुरावा करावा. औद्योगिक क्षेत्रातील साहित्य, कच्चा माल, वाहने आदींच्या सुरक्षेसाठी पुरेशा गस्त पथकांच्या फेºयाचे नियोजन असून, उद्योजकांनी आपल्या समस्या व अडचणी निर्भीडपणे मांडाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव, निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, नितीन वागस्कर व श्रीपाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.प्रास्ताविक शशिकांत जाधव यांनी केले. तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे, अतुल दवंगे, कैलास आहेर, किरण पाटील, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, प्रदीप पेशकार, नामकर्ण आवारे, किरण वाजे, एम. जी. कुलकर्णी, हिमांशू कनानी, राजेंद्र जाधव, बबन वाजे, अतुल अग्रवाल, रावसाहेब रकिबे, नीलिमा पाटील, जयंत पवार, संजय महाजन, मनीष रावल, श्रीकांत बच्छाव, नंदलाल शिंदे, अखिल राठी, मिलिंद राजपूत, बाळासाहेब हासे, अतुल संगमनेरकर, बाळासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.अडचणी जाणून कार्यवाही करणारग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात २७ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली असून, या बैठकीत सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव येथील उद्योजक व व्यावसायिकांच्या अडचणी जाणून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. उद्योजकांच्या प्रश्नांबाबत विविध पोलीस ठाण्यांना निर्देश देण्यात आले असून, ते लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केले जातील. तरी उद्योजकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी यावेळी केले.
पोलीस आयुक्तांनी साधला उद्योजकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:17 AM