नाशिक: रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई- आग्रा महामागालगत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगन्मताने चालणारा पर्यायी बाजार पोलिसांनी उधळून लावला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यावहारांना बाजाराचे स्वरुप येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर कारवाई करून शेतकरी व व्यापाऱ्यांना हुसकाऊन लावले. परंतु, अचानक झालेल्या या कारावई मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासग परिसरातील रानमाळात पळ काढाला लागाल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवाराताच व्यापाऱ्यांसह अन्य काही नागरिकांनाही कोरोनाची लागन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर आणि गर्दीवर निर्बंध आले आहे. येथे नोंदणीकृत व्यापाऱ्यांव्यतिरिक्त अन्य खरेदीदारांना प्रवेश दिला जात नसल्याने इतर व्यापारी बाजारसमितीच्या आवाराबाहेर मिळेलल तेथे शेतमाल खरेदी करतात. त्याचप्रमाणे एकाच वाहनातून अनेक शेतकरी माल घेऊन येतात. मात्र बाजार समितीत वाहनचालक व एक शेतकख्यालाच प्रवेश मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी मिळून नाशिक शहरालगत मुंबई- आग्रा महामार्गवर रायगडनगर ते वाडिवऱ्हे दरम्यान अवजड वाहनांसाठी व स्वच्छतागृसाठी असलेल्या खुल्या जागेत छोटेखानी पर्यायी बाजार सुरू केला होता. परंतु, हळुहळू या ठिकाणी शेतकरी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने बुधवारी (दि.१०) अखेर पोलिसांनी कारवाई करीत या ठिकाणी जमलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हुसकावून लावले.
पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. तसेच याठिकाणी थांबलेली अनेक वाहने अचानक महामार्गावर आल्याने काही काळ याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन अक्षर: परिसरातील माळरानावर पळ काढावा लागल्याचे चित्र दिसून आले. शेतमालाची विक्री कशी करावी नाशिक कृषी उत्तन्न बाजारसमितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारसमितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटली आहे. हे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शेतमालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.