दिंडोरी : तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत अवैध दारू विक्रीवर चर्चा झाली होती.यावर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांनी परिसरातील माहिती घेण्यास सुरुवात केली. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत पालखेड बंधारा येथे राहणारा शशिकांत गजानन सोनवणे हा अवैधरित्या चोरट्या रीतीने देशी दारूची विक्री करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांना बातमी मिळाली. याबाबत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इसमाच्या ताब्यात पाच खाकी रंगाच्या बॉक्समध्ये ११,५९६ रुपये किमतीच्या २२३ देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.अवैध चोरून दारूविक्री, कोरोना विषाणू रोग संदर्भात कलमांनुसार शशिकांत सोनवणे यांच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दिंडोरीत पोलिसांची अवैध दारू विक्रीविरुद्ध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 1:24 AM