नाशिक : खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी ही माहिती दिली.दोन वर्षांपूर्वी खालप ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीच्या मूळ मालकालाच विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी कैलास देवरे यांनी शासनाकडे अर्ज केला होता. देवरे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता, परंतु याबाबत शासनस्तरावरून योग्य कार्यवाही होत नसल्याची त्यांची तक्र ार होती. याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयवंत भामरे यांनी तीन महिन्यांपूर्वीच देवळा पोलीस ठाण्याला फिर्याद दिली होती; परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी या प्रकरणाचा सर्वसमावेशक चौकशी अहवाल प्राप्त न झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात अडचण निर्माण झाली होती. याबाबत तत्कालीन पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी संबंधित विभागाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर विस्तार अधिकारी भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलमप्रमाणे तीन ग्रामसेवक, दोन माजी सरपंच, माजी उपसरपंच व तीन तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आदी नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर हे पुढील तपास करीत आहेत.वरिष्ठांची परवानगी न घेता ग्रामनिधीतून विहीर खरेदी करण्याकरिता लागणारे मुद्रांक शुल्क नोंदणीची ८,४३७ रुपये एवढा नियमबाह्य खर्च केला. विहिरीच्या जागा मालकांनी शासनाचे व ग्रामपंचायतीचे नुकसान होईल, अशा अटीवर विहिरीवर स्वत:चा हक्क अबाधित राखून विक्र ी केली. तसेच विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीचा व शासकीय मालमत्तेचा स्वत:च्या हितासाठी वापर केला. योग्य ती प्रक्रिया न राबविता दि. १७/२/२०१६ रोजी सदर विहीर मूळ मालकास परत करीत विक्री करून दस्त बनविला.असे आहे प्रकरणसन २०११ ते १६ या कालावधीत तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमत करून खालप गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून दि. २२ जुलै २०११ रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव घेतला. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांची परवानगी घेणे आवश्यक असताना, तसे न करता परस्पर खर्च करून दि. २७/०७/२०११ रोजी विहीर खरेदी केली. तसेच सदर विहिरीवर शासनाचा ६ लाख ८८ हजार ९७५ रु पये एवढा खर्च केला. तसेच ग्रामपंचायतीचे नुकसान होईल, अशा अटी स्वीकारून खासगी व्यक्तीचे हितसंबंध जोपासण्याकरिता शासकीय निधीचा वापर केला.
खालप येथील विहीर विक्र ीबाबत पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:34 PM
खालप येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा विहिरीची विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी खालप ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अशा नऊ जणांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी ही माहिती दिली.
ठळक मुद्दे तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांचा समावेश