नाशिक : चौदा दिवसांपूर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तिघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने सात दिवसांची (दि.४ जानेवारी) पोलीस कोठडी सुनावली. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्याच्या रेल्वेस्थानकापासून काही मीटर अंतरावर असलेल्या पंजाब आर्म्स सेंटर हे शस्त्रांचे दुकान बादशाह ऊर्फ सुका व त्याच्या साथीदारांनी बुधवारी (दि.१३) मध्यरात्री लुटल्याची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलिसांनी नाकाबंदी करून शस्त्रांचा साठा असलेल्या जीपसह सुका पाचा व त्याच्या साथीदारांना गुरुवारी (दि.१४) रात्री महामार्गावर रंगेहाथ पकडले होते. यानंतर पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या संशयितांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी (दि.२८) विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. या संशयितांवर २७ डिसेंबर रोजी मोक्का कायद्यान्वये तरतुदींचा अहवाल नाशिकच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या शिवडीमध्ये राहणारा संशयित वाजीद शहा यास अजमेर येथून ताब्यात घेतले होते. वाजिदसह तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली.बांदा, अंबोली, चांदवड, आरएके, मालेगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. विशेष मोक्का इनचार्ज न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्रकुमार शर्मा यांनी संशयित आरोपींना पुढील सात दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. संघटित गुन्हेगारी आहे, यापर्यंत पोलीस तपास येऊन पोहचला आहे. चांदवड येथून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एक संश्यित अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने त्याला मोक्का कारवाईतून वगळण्यात आले. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद असाशस्त्रलुटीच्या गुन्ह्यामागे आंतरराष्टÑीय टोळी असण्याची दाट शक्यता असून, त्याबाबतचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाही. संशयित आरोपींमध्ये गुन्ह्णाचा मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान सुका पाचा असला तरी त्याने कुठल्या मोठ्या गुंडाच्या सांगण्यावरून हा कटकारस्थान रचला याबाबत तपास करणे. या गुन्ह्यामागे संशयितांना कोणता आर्थिक फायदा झाला आहे याचा तपास करणे. शस्त्रसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात लुटून तो मुंबईच्या दिशेने वाहतूक करण्यामागे मोठा घातपात करण्याचा वाजवी संशय आहे. यानुसार माहिती मिळविण्यासाठी तपास करणे.सुका पाचावर २६ गंभीर गुन्हेसुका पाचा हा मुंबईचा सराईत गुन्हेगार असून, धाडसी चोºया, जबरी लूट, हाणामाºया, खून, महागडे वाहनचोरी, शस्त्रलूट, शस्त्र खरेदी-विक्री यांसारखे गंभीर गुन्हे दाऊदचा शार्पशूटर समजला जाणारा सुका पाचावर दाखल आहे. एकूण २६ गुन्हे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
या बाबींचा उलगडा अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बोलेरो जीपची चोरी.बद्रीनुजमान ऊर्फ सुका पाचा याने आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव पश्चिम परिसरात बनावट आधार कार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, एका गुन्हे मासिकाच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार करून स्वत:ला पत्रकार भासविण्याचा प्रयत्न केला.उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून जबरी धाडसी शस्त्रास्त्रांची लूट केली.संघटित गुन्हेगारी या शस्त्रसाठा लुटीच्या गुन्ह्यामागे असल्याचे समोर आले आहे.