लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करीत स्कॉर्पिओतून आलेल्या संशयितांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले दूध ओतून दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२) सायंकाळी महात्मानगर परिसरात घडली़सतीश नारायण कोठुळे (रा. पेठरोड, दत्तनगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे हॉटेल सायली शेजारील गणपती मंदिराजवळील पत्र्यांच्या शेडमध्ये दूध संकलन केंद्र आहे. सायंकाळी कोठुळे यांचा पुतण्या या ठिकाणी असताना स्कार्पिओ (एमएच १५, इएक्स ५५९९) मधून आलेल्या ५ ते ६ संशयितांनी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणाबाजी करीत कॅनमधील सुमारे चारशे लिटर दूध रस्त्यावर ओतून नुकसान केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दूध ओतणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Published: June 04, 2017 2:30 AM