ओझर टाउनशिप : एचएएल हायस्कूल मराठी माध्यम ओझर येथे रेझिंग डे निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी मुला-मुलींना वाहतुकीचे नियम व नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर दंड वसुलीचे नियम आदींची माहिती दिली.जर एखादा अपघात झालेला पाहिला तर आधी त्यांना मदत करावी पाणी देणे वगैरे, नंतर लगेच १०२ नंबरला फोन करावा म्हणजे अँब्युलन्स त्वरित घटनास्थळी येईल आणि अपघात झालेल्याला मदत मिळेल. यात खबर देणारा आणि मदत करणाºयास कोणताही त्रास होणार नाही. बºयाच वेळेस अपघात पाहूनही नको ती झंझट म्हणून आपण अंग काढून घेतो असे न करता आपल्यातील माणुसकी दाखवा व मदत करा, जेणे करून एखाद्याचा त्वरित उपचारामुळे जीव वाचू शकतो. मदत करणाºयास पोलिसांकडून मदतच केली जाते. शाळा कॉलेजमध्ये व रस्त्याने सडक सख्याहरी छेडछाडीचे प्रयत्न करतात, शालेय मुलींसाठी महिला पोलिसांचे दामिनी पथक सदैव तत्पर असते,अशा सडक सख्याहरींना वठणीवर आणू. मुलींनी आता घाबरण्याचे कारण नाही, संरक्षण देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच सध्या पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
एचएएल हायस्कूलमध्ये पोलिसांनी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 11:12 PM