शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

पोलीस हतबल : नाशिककरांच्या दुचाकी भरदिवसा होताहेत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 3:45 PM

नाशिक : परिसरातील पंचवटी म्हसरूळ तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने ...

ठळक मुद्देबडी दर्गाच्या प्रारंगणातून दुचाकी गायबपोलीस कर्मचारी देखील हतबल झाले टोळीत विधीसंघर्षित अल्पवयीन बालकांचा समावेश

नाशिक : परिसरातील पंचवटी म्हसरूळ तसेच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहे. परिसरातून दररोज किमान एक ते दोन दुचाकी चोरी होत असल्याने दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तिवली जात आहे. परिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार घडत असल्याने पोलीस कर्मचारी देखील हतबल झाले आहेत.रहिवाशांनी त्यांच्या दारापुढे किंवा सोसायट्यांच्या वाहनतळातील दुचाकी सुरक्षित आहे, किंवा राहतील याची शाश्वती पंचवटीसह म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील परिसराबाबत देता येत नाही. बनावट चावीचा वापर करत दुचाकी चोर सर्रास हॅण्डल लॉक तोडून दुचाकीची पळवून नेत असल्याचे उघडकीस येत आहेत. याप्रकारचे गुन्हे दररोज या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल होत आहे. गायत्री किरण कडाळे (२५,रा.पेठरोड) यांच्या मालकीची २० हजार रुपये किं मतीची मोपेड दुचाकी (एम.एच १५ईडब्ल्यू ५१९४) प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली. विशेष म्हणजे कडाळे यांनी दुचाकी त्या राहत असलेल्या विजय संकुल या राहत्या इमारतीच्या वाहनतळात उभी केली होती.दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता मात्र त्यानंतर आता पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रीय झाली आहे. चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांना राहत असलेल्या इमारतीच्या वाहनतळावर वाहने लावताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. चोरट्यांच्या टोळीत विधीसंघर्षित अल्पवयीन बालकांचा समावेश असून त्यांच्यामार्फत काही सराईत गुन्हेगार दुचाकी चोरीच्या घटना घडवून आणल्याचे बोलले जात आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका चारचाकी वाहनविक्रीच्या शोरूमच्या वाहनतळात उभी केलेली पल्सर दुचाकी (एमएच१४ डीसी ३०७५) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिषेक किशोर पाटील यांच्या मालकीची तीस हजाराची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे.बडी दर्गाच्या प्रारंगणातून दुचाकी गायबभद्राकली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसांपुर्वीच सीबीएस परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पिंजारघाट बडी दर्गा येथे दर्शनासाठी आलेले भाविक आवेज रफिक अत्तार (३४,रा.पालखेड दिंडोरी) यांची होंडा पॅशन दुचाकी (एम.एच १५ अ‍ेझेड ९५०३) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी