लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाहतूक नियमाचा भंग केल्याने वाहनाची कागदपत्रे तसेच दंड भरण्यास सांगितल्याचा राग आलेल्या दुचाकीवरील महिलेने शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या सुमारास सीबीएस सिग्नलवर घडली़ युवराज गोपीचंद गायकवाड असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी गायकवाड हे सीबीएस सिग्नलवर कर्तव्यावर होते़ सकाळी १० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १५, ईएन ०९८१) आलेले संशयित उज्ज्वला बोरसे (२५) व त्यांचे पती कैलास बोरसे (२६, रा. मोरे मळा, नाशिक) यांनी मोडक सिग्नल येथे उजवीकडे वळण नसताना शालिमारकडे दुचाकी वळवून नियमाचा भंग केला़ गायकवाड यांनी दुचाकी अडवून बोरसे यांच्याकडे दंडाची मागणी केली़ यावेळी गायकवाड यांना कैलास बोरसे यांनी अरेरावी सुरू केली, तर उज्ज्वला बोरसे यांनी गायकवाड यांचा हात पकडला़ या घटनेचे मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटिंग करीत असल्याचा राग आल्याने उज्ज्वला बोरसे यांनी गायकवाड यांना मारहाण केली़ याप्रकरणी बोरसे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़मारहाण करणारी महिला रुग्णालयातपोलीस कर्मचारी गायकवाड यांना मारहाण करणाऱ्या उज्ज्वला बोरसे यांना अटक केल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
भर चौकात वाहतूक पोलिसास महिलेने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:51 AM