शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शिवसेना महानगरप्रमुख बोरस्तेंची पोलीस चौकशी

By admin | Published: May 18, 2014 11:30 PM

सुमारे दोन तास चौकशी : आज पुन्हा चौकशी

सुमारे दोन तास चौकशी : आज पुन्हा चौकशी नाशिक : पगारे टोळीने व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेल्या खंडणी प्रकरणात अटक केलेल्या गुन्हेगारांशी कथित संबंध प्रकरणी आज शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांची सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी सुमारे दोन तास प्राथमिक चौकशी केली़ या चौकशीतील तपशील कळू शकला नसला, तरी बोरस्ते यांना सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शे˜ीवर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये झालेला हल्ल्याच्या प्रयत्न, सराईत गुन्हेगार भीम पगारेची हत्त्या आणि त्यापूर्वी एका व्यावसायिकाचे अपहरण करून उकळण्यात आलेली खंडणी या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचे राजकीय हितसंबंध असल्याच्या कथित संशयावरून सेना-मनसेच्या चार नगरसेवकांना पोलिसांनी मंगळवारी (दि़ १३) नोटिसा बजावल्या होत्या़पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी बुधवारी (दि़ १४) मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश सोनवणे यांची प्राथमिक चौकशी केली होती़ अजय बोरस्ते यांना पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांनी नोटीस काढल्याने त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते़ मात्र ते परदेशात असल्याने येऊ शकले नव्हते़ दरम्यान, आज त्यांची राजपूत यांनी प्राथमिक चौकशी केली, तसेच गरज भासल्यास सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)