नाशिक : शहरातील २० पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे गुरुवारी (दि़३१) रात्री पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी आदेश काढले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची पंचवटी पोलीस ठाण्यात, तर पंचवटीचे दिनेश बर्ढेकर यांची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे़ शहर वाहतूक शाखेतील महिला पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांची तांत्रिक विश्लेषण विभागात बदली करण्यात आली आहे़, तर आर्थिक गुन्हे शाखेचे विजय पन्हाळे (प्रशासन विभाग), विशेष शाखेचे किशोर मोरे (गंगापूर पोलीस ठाणे), दहशतवादविरोधी पथकाचे सोमनाथ तांबे (अंबड पोलीस ठाणे), अंबड पोलीस ठाण्याचे मधुकर कड (पंचवटी पोलीस ठाणे), वाहतूक शाखेतील गुरुनाथ नायडू (शहर नियंत्रण कक्ष), पंचवटी पोलीस ठाण्याचे दिनेश बर्डेकर (गुन्हे शाखा युनिट २), सातपूर पोलीस ठाण्याचे राजेश आखाडे (दहशतवादविरोधी पथक), नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे (विशेष शाखा), नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सूरज बिजली (आडगाव पोलीस ठाणे), मुंबई नाका पोलीस ठाणे सुरेंद्र सोनवणे (शहर वाहतूक शाखा), महिला सुरक्षा विभागाचे अनिल पवार (देवळाली कॅम्प पोलीस ठाणे), देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सुभाष डौले (महिला सुरक्षा विभाग), गंगापूर पोलीस ठाण्याचे कैलास पाटील (नियंत्रण कक्ष), गुन्हे शाखा युनिट दोनचे नीलेश माईनकर (दंगल नियंत्रण पथक), आडगाव पोलीस ठाण्याचे सुनीलकुमार पुजारी (आर्थिक गुन्हे शाखा), मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सुनील नंदवाळकर (आर्थिक गुन्हे शाखा) भद्रकाली पोलीस ठाण्याचे कमलाकर जाधव (सायबर पोलीस ठाणे), दंगल नियंत्रण पथकातील मनोज करंजे (मुंबई नाका पोलीस ठाणे), तांत्रिक विश्लेषण शाखेचे राजेंद्र कुटे यांची सातपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे़ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबरोबरच आयुक्तांनी शहरातील १४ पोलीस ठाण्यांमधील ३४ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांची सातपूर पोलीस ठाणे, तर पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व अंबड पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे यांची यांची गुन्हे शाखा युनिट एकमध्ये बदली करण्यात आली आहे़
पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:21 AM