नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१3) जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सकाळी दहा वाजेपर्र्यंत ७३२ इतका झाला. यामध्ये २५ पोलिसांची भर पडली. मालेगावात लॉकडाउन काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसरूपी ‘कोरोना वॉरियर्स’भोवती कोरोनाचा फास अधिकच घट्ट होत जात आहे. तसेच तीस-या टप्प्यात पावणे बारा वाजता प्राप्त ६२ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले, यामध्ये एक मालेगावमधील महिला पोलीस तर अन्य सहा राज्य राखीव दलाचे जवानांचा समावेश आहे. हे जालना येथून मालेगावात बंदोबस्तासाठी तैनात होते. आज सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एकूण २५ करोनाग्रस्त रूग्णांची भर जिल्ह्यात पडली. एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मालेगाव बंदोबस्तावर असलेले जालना, अमरावतीचे पोलीस कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 1:13 PM
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१3) जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सकाळी दहा वाजेपर्र्यंत ७३२ इतका झाला. ...
ठळक मुद्देपोलिसरूपी ‘कोरोना वॉरियर्स’भोवती कोरोनाचा फास अधिकच घट्ट सर्व पंधरा पोलीस असून ते नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये वास्तव्यास