नाशिक : पोलीस दलात २० वर्षे विना अपघात तसेच राष्टÑीय खेळात विशेष प्रावीण्य दाखवून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत पोलीस दलाची मान उंचविणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी बोधचिन्ह मंजूर केले आहे.येत्या महाराष्टÑ दिनाच्या समारंभात पोलीस पदक देऊन पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे. पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्याने वैशिट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केले जाते.यांचा होणार सन्मान सहा. उपनिरीक्षक-राजू साळवे (पंचवटी), मनोहर वाघ (गंगापूर), शिवाजी देशमुख (सातपूर), पोपट कारवाल (गुन्हे), रमेश देशमाने (वाहतूक), संजय सूर्यवंशी (चालक), हवालदार-नंदू उगले (बीडीडीएस), चंद्रकांत सदावर्ते (मुख्यालय), दत्तात्रय पाळदे (इंदिरानगर), मधुकर घुगे (मुंबई नाका), माणिक गायकर (गंगापूर), सोमनाथ सातपुते (भद्रकाली), रवींद्र बागुल (गुन्हे), मोहन कडवे (एटीसी), मनोज विशे (म्हसरूळ), पोपट माळोदे (महिला सुरक्षा), संजीव जाधव (अंबड), अनिल दिघोळे (गुन्हे), गणेश भामरे (अंबड), महेबूब सय्यद (दे. कॅम्प), कैलास कुशारे (सरकारवाडा), जितेंद्र परदेशी (मुंबई नाका), प्रफुल्ल माळी (मुख्यालय), दिलीप ढुमणे (मध्य. गुन्हे), संजय सानप (दे. कॅम्प), प्रदीप म्हस्दे (सरकारवाडा).
२६ पोलिसांना पोलीस पदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:15 AM