शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

महिला एपीआयसह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:15 AM

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून ...

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील कोकणगांव फाटा, महामार्ग पोलीस चौकीतील महिला सहायक पोलीस अधिकारीसह एका पोलीस नाईकाने मालवाहतूक उद्योजकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या निदर्शनास आल्याने दोन्ही संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात एका मालवाहतूकदार व्यावसायिकाने दोन्ही संशयितांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयितांकडून फिर्यादीकडे नाशिक मालेगाव महामार्गावर चालणाऱ्या ३५ वाहनांची अडवणूक न करता सर्व वाहने सुरळीत चालू देण्यासाठी संशयित सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश भास्कर सानप यांनी ८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे वाहतूकदाराने तक्रार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १५) सापळापूर्व पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान एपीआय वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश सानप यांनी वाहतूकदाराकडून तडजोडीअंती ८ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात शनिवारी (दि.१९) ओझर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.