शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:14 PM

कळवण : अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध आहे. जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेऊन योजनेला विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी कळवणच्या सर्व नेत्यांना नोटिसा बजावल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देपुनंद प्रकल्प : सटाण्याच्या थेट जलवाहिनीला विरोध

कळवण : अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध आहे. जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेऊन योजनेला विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी कळवणच्या सर्व नेत्यांना नोटिसा बजावल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.सटाणा नगर परिषदेने पोलीस यंत्रणेकडे जलवाहिनी योजना पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडे पोलीस बंदोबस्त मागितला असल्याने या पार्श्वभूमीवर कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पुनंद प्रकल्प पाणीपुरवठा योजनेसंदर्भात तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, आंदोलक नेते यांची मंगळवारी सायंकाळी तातडीची बैठक बोलवून योजनेबाबत भूमिका जाणून घेतली.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, शेतकरी नेते शांताराम जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, माकपचे मोहन जाधव, नीलेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सेल जिल्हाध्यक्ष रामा पाटील व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक कळवण पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली.पुनंद प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातून पाण्याची वाढलेली मागणी, शासनाची भूमिका, तालुक्यातील पाण्याची आज आणि परिस्थिती व मागणी, पुनंद प्रकल्प अंतर्गत असलेल्या जलवाहिनी योजनेला विरोध संदर्भात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली व पाणीपुरवठा योजनेला विरोध केला. सटाणा नगर परिषदेने जलवाहिनी योजनेचा अट्टाहास न करता कालव्याद्वारे पाणी घेऊन जावे, साठवण बंधारा बांधून तेथून जलवाहिनीद्वारे पाणी न्यावे, अशी भूमिका कळवणच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी घेतली.राज्य सरकारने पुनंद प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, पाइपलाइनचे काम आगामी काळात सुरू होणार असल्याने अडथळा आणू नका, अशी अपेक्षा पोलीस यंत्रणेने यावेळी व्यक्त करून राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची असल्याचे यावेळी सांगितले.दरम्यान राज्य सरकार शासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर करून दबाव आणून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरासाठी जलवाहिनीद्वारे पाणी तर जाऊ देणार नाही, परंतु कालव्याद्वारे देखील पाणी देण्यास आमचा विरोध राहील अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सटाणा नगर परिषदेचे पदाधिकारी व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन याप्रश्नी चर्चा करण्याची तयारी कळवणच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बैठकीत दाखवली. पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हेसटाणा शहराकरिता पाइपलाइन योजना शासनाने मंजूर केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी पुनंद प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. सदर योजनेचे काम लवकर सुरू होणार आहे. या कामात अडथळा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामास विरोध व अडथळा आणून शांततेचे उल्लंघनव कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल.असा आशयाची नोटीस कळवण पोलीस स्टेशनने मंगळवारी झालेल्या बैठकीत उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिली. शासनाचे पोलीस यंत्रणेकडून दबाव आणून योजना पूर्ण करण्याचे स्वप्न धुळीस मिळवू, जलवाहिनी योजनेचा पाइप तालुक्यात उतरू देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतल्याने पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.