पंचवटी : बेकायदेशीररीत्या अतिरिक्त शुल्कवसुली तसेच शिष्यवृत्ती देण्यास टाळाटाळ करणारे शिवांजली ट्रस्टच्या साई केअर नर्सिंग महाविद्यालयाच्या विरोधात सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात रविवारी (दि़८) लेखी तक्रार केली़ शुल्कवसुली करणाऱ्या या महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे़ जिल्ह्याच्या आदिवासी भागातील विद्यार्थी या नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असून, व्यवस्थापनाने प्रत्येक विद्यार्थ्यास वेगवेगळे शुल्क आकारले. विद्यार्थ्यांचे बँक पासबुक, एटीएम कार्ड जमा करून प्रत्येकाकडून दहा कोºया धनादेशावर स्वाक्षरी घेऊन ते जमा केले आहे़ शासनाने या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांची शिष्यवृत्ती जमा केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़ विद्यार्थ्यांची जमा झालेली शिष्यवृत्ती महाविद्यालय व्यवस्थापन परस्पर काढून घेत त्याचा अपहार करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे़ त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे़ यावेळी प्रियंका दांडेकर, सुषमा चौरे, पल्लवी गावित, कल्पना वसावे, द्रौपदी पळवी, सखू भडांगे, सुशीला वसावे, सरिता गुरोडा, आदी विद्यार्थी उपस्थित होते़
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची पोलिसांत धाव आंदोलन : अतिरिक्त शुल्कविरोधात पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:36 AM
पंचवटी : बेकायदेशीररीत्या अतिरिक्त शुल्कवसुली तसेच शिष्यवृत्ती देण्यास टाळाटाळ करणारे शिवांजली ट्रस्टच्या साई केअर नर्सिंग महाविद्यालयाच्या विरोधात सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात रविवारी (दि़८) लेखी तक्रार केली़
ठळक मुद्देप्रत्येक विद्यार्थ्यास वेगवेगळे शुल्क आकारलेलाखो रुपयांची शिष्यवृत्ती जमा केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे