चौकट===
मागील आठवड्यात याच भागातील शिवसेनेचे नगरसेवक अंबड पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर कारवाई करावी, यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी गुन्हेगरावर कारवाई करणे बाजूला ठेवत लोकप्रतिनिधींना खडेबोल सुनवत, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना जर अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे कशी दाद मागणार, असा प्रश्नही या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोट====
डीजीपीनगर, वनश्री कॉलनी यासह परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. परिसरातील रहिवाशांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी वनश्री कॉलनी येथे पोलीस चौकी उभारली आहे, परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नसल्याने नागरिकांना यासाठी अंबड पोलीस ठाण्यात जावे लागते.
- धनाजी लगड, प्रभाग समिती सदस्य, मनपा नाशिक
(फोटो ०१ चौकी)