शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

पोलीस कर्मचारी परतीच्या वाटेवऱ़़

By admin | Published: September 19, 2015 10:43 PM

पोलीस कर्मचारी परतीच्या वाटेवऱ़़

नाशिक : राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून सिंहस्थातील बंदोबस्तासाठी आलेले व गत दोन महिन्यांपासून शहरात वास्तव्यास असलेले सुमारे १२ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि़२०) परतीच्या मार्गाला लागणार आहेत़ कुंभपर्वातील बंदोबस्ताचा अनुभव गाठीशी बांधून परतणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे़बारा वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुमारे दोन वर्षांपासून पोलीस प्रशासनाचे बंदोबस्ताचे नियोजन सुरू होते़ या बंदोबस्तासाठी पोलिसांनी आधार घेतला तो रमणी आयोगाचा़ राज्यशासनानेही पोलीस यंत्रणेला बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस बलासह, तांत्रिक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या़ याबरोबरच स्वतंत्र कुंभमेळा मंत्र्याची नियुक्तीही केली होती़ सिंहस्थासाठी शहरात रमणी आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस बंदोबस्त व बॅरिकेडिंगचे नियोजन करण्यात आले होते. तसेच राज्यभरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आदिंसह अनुभवी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. सुमारे अठरा हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते़ त्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, १४ पोलीस उप आयुक्त, ३५ सहायक आयुक्त, १८६ पोलीस निरीक्षक , ७३० सहायक निरीक्षक, ९०७२ पोलीस कर्मचारी, १३ बॉम्बशोधक पथके, एसआरपीएफ कंपन्या, शीघ्र कृती दल यांचा समावेश होता. पर्वणीसाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सुमारे ७२ तास कर्तव्य बजावले़ त्यामध्ये बुडणाऱ्यांना जीवदान देण्याबरोबरच साधू-महंतांच्या,भाविकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी पार पाडली़ सुमारे दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर या सर्वांची शहराशी जवळीक निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़ सिंहस्थ बंदोबस्तातील सर्व कर्मचारी उद्या मूळ सेवेत परतणार आहेत़. (प्रतिनिधी)