नाशिक : शासकीय अधिकाºयांनी हाताखालच्या कर्मचाºयांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो, विशेष करून पोलीस खात्यात तर पोलीस कर्मचाºयांना अधिकाºयांच्या बायका-मुलांचीही खासगी कामे करावी लागल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना त्यात नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांची भर पडली आहे. विनयकुमार चौबे यांची मुलगी आजाराने रुग्णालयात दाखल असताना चौघा पोलिसांनी तिला बरे करण्यात अथक परिश्रम घेतल्याबद्दल महानिरीक्षकांनी पोलीस खात्याच्या निधीतून त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केल्याची बाब राज्यभर चर्चेत आली आहे. जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटिसीत हा प्रकार उघडकीस आला असून, त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचाºयांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच, परंतु अशा कर्मचाºयांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. अर्थात सदरचा प्रकार पोलीस खात्यातच होतो असे नाही तर अन्य शासकीय खात्यांमध्येही असाच प्रकार सुरू असून, कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिकाºयांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. नाशिकच्या एका माजी विभागीय आयुक्तांच्या घरी स्वयंपाकाचे काम करणाºया कोतवाल व महसूल खात्याच्या महिला शिपायांचा आयुक्तांच्या पत्नीकडून होणाºया छळाची उदाहरणे आजही दिली जात आहेत. अशा परिस्थितीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची कन्या जानेवारी महिन्यात आजारी पडल्याने तिला उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन,तीन दिवसांच्या उपचारानंतर कन्या बरी झाल्याने तिला घरी सोडण्यात आले. परंतु या काळात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय निंबा खराटे, आसिफ उमर शेख, पोलीस शिपाई मारुती सटवा पांडलवाड, किरण देवराम नागरे या चौघा कर्मचाºयांनी विशेष मेहनत घेतल्याचे चौबे यांचे म्हणणे आहे. या चौघा कर्मचाºयांची बक्षिशीची घोषणा करणाºया पोलीस नोटीसमध्ये ‘दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये श्रमदान करीत विशेष मेहनत घेऊन जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली’ असे गौरवोद्गार काढण्यात आले असून, त्यापोटी त्यांना प्रत्येकी शंभर रुपये रिवार्ड देण्याची शिफारस करण्यात आली व त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मुळात चौबे यांच्या कन्येवर दिवसरात्र हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांनी उपचार केलेले असताना चौघा कर्मचाºयांनी दिवसरात्र नेमकी काय मेहनत घेतली हे कळू शकलेले नाही.
म्महानिरीक्षकांचे खासगी काम करणाºया पोलिसांना ‘बक्षिसी’ ाुलीची शुश्रूषा : ग्रामीण पोलिसांचा अफलातून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:05 AM
नाशिक : शासकीय अधिकाºयांनी हाताखालच्या कर्मचाºयांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो.
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षकांची भर पडलीघरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज