नानेगाव येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी सोमवारी (दि. १९) रांग लावलेली होती. एका रांगेत क्रमवारीनुसार लसीकरण सुरू असताना संशयित आडके याने वाद घालत रांगेत उभे न राहता केंद्रावर लस देणाऱ्या डॉक्टरांच्या समोरील खुर्चीवर जाऊन ठिय्या मांडत ‘मला लस द्या...’ असे सांगत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. बिट मार्शल हवालदार विवेक शांताराम साळवे ( ५४) व पोलीस शिपाई गोरे हे त्यांच्या सरकारी दुचाकीने (एम.एच. १५ ए.ए. ४२४८) केंद्रावर दाखल झाले. यावेळी साळवे यांनी आडके यास हुज्जत व वाद घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट त्यांचा गणवेश धरत फीत ओढत फाडून टाकली. ‘तुम्ही कोण मला सांगणारे...?’ असे म्हणत अरेरावीची भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणत झटापट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस बिट मार्शलच्या वर्दीवर टाकला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:12 AM