शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

गंगापूररोडवरील स्पा-सेंटरवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:07 PM

कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक फैलावू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सलून व स्पा-सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही.

ठळक मुद्देबनावट ग्राहक पाठवून खात्री करत छापा मारला.

नाशिक : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारकने सलून, स्पा-पार्लर बंद ठेवण्याचे दिलेले आदेश अद्याप कायम असून ही दुकाने उघडण्यास कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्रासपणे गंगापूररोडवर अशाचपध्दतीजे एक स्पा-सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री करत छापा मारला.कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक फैलावू नये, यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी शहरासह संपुर्ण जिल्ह्यात सलून व स्पा-सेंटर सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. तरीदेखील गंगापूररोडवरील थत्तेनगर या भागात गणेशकुबेर व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे विनापरवानगी स्पा-सेंटर चालविले जात असल्याची गोपनिय माहिती थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुदगल यांच्यासह उपनिरिक्षक सचिन शेंडकर यांच्या पथकाने या ठिकाणी दाखल होऊन दोन पंचांसमक्ष एक बनावट ग्राहक स्पा-सेंटरमध्ये पाठविला. सेंटणमध्ये संबंधित व्यावसायिकाने त्यास प्रवेश देत त्याच्याकडून रक्कम आकारून त्याची बॉडी मसाज करून देण्यास तयारी दर्शविल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने या ठिकाणी छापा टाकला. स्पा-सेंटरचालक प्रदीपकुमार लक्ष्मण माने(३०. रा. वैभव कॉलनी राजीवनगर), व्यवस्थापक ज्ञानेश्वर बबन गवारे (रा. बजरंगवाडी, द्वारका) यांना रंगेहात ताब्यात घेतले. पथकाने पंचनामा करून संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस