त्र्यंबकेश्वर : मुलीचा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न होत असतांना अचानक विवाह सोहळ्यात पोलिसांनी केवळ ५० लोकांची विवाहास परवानगी असतांना जवळपास ३०० ते ४०० व-हाडी मंडळी उपस्थित होते. यावेळी कोव्हीड -१९ च्या त्रिसुत्री नियमांचे उल्लंघन केल्याने विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके सुरु असतांना अचानक पोलीसांनी छापा टाकुन विवाह सोहळा थांबवला.या प्रकरणी ब्राम्हणवाडेचे ग्रामसेवक चंद्रकांत शिरोळे यांनी वधुचे पालक काळु भारस्कर यांच्या विरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.सध्या त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असुन सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वरला आठ दिवसांचा उत्स्फुर्त कर्फ्यु पुकारला आहे. शासनानेही गर्दी होवू नये म्हणुन अंशतः लॉकडाउन पुकारला आहे. लग्न सोहळे, अंत्यविधी आदी कोणत्याही सामाजिक सोहळ्यांवर मोजकीच उपस्थिती असावी असे निर्बंध लागू केलेले असतांनाही लोक नियम पाळत नसल्याने शेवटी प्रशासनाने कठोर कारवाई सुरु केली आहे.त्र्यंबकेश्वरपासुन अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील ब्राम्हणवाडे शिवारात ब्राम्हणवाडे त्र्यंबक येथील काळु रेवजी भारस्कर यांच्या मुलीचा विवाह शिवणगाव ता. नाशिक येथील जीवन देवराम चोथवे यांच्या मुलाशी गुरुवारी (दि.१) दुपारी १२.३० वा. निश्चित झाला होता. त्याप्रमाणे विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके सुरु होती. आणि अचानक या विवाह सोहळ्यात पोलिसांची एन्ट्री झाली.यावेळी कोणाच्याही चेह-यावर मास्क नव्हता, विवाह सोहळ्यात ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती, जेथे अवघी ५० लोकांची परवानगी देण्यात आली होती तेथे तीनशे ते चारशे लोकांची उपस्थिती होती. म्हणुन वधु पालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा छापा उप उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, वेळुंजे येथील मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी पोलीस पाटील कोतवाल, सहायक पोलीस उपनिरीक्षक यल्लप्पा खैरे, पोलीस नाईक प्रदीप भाबड आदी उपस्थित होते.पोलीसांनी भारतीय दंड विधान कलम १८८,२६९, २७० तसेच साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये आपत्ती व्यवस्थापन २००५/५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विवाह सोहळ्यावर पोलिसांचा छापा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 10:01 PM
त्र्यंबकेश्वर : मुलीचा विवाह गुरुवारी दुपारी संपन्न होत असतांना अचानक विवाह सोहळ्यात पोलिसांनी केवळ ५० लोकांची विवाहास परवानगी असतांना जवळपास ३०० ते ४०० व-हाडी मंडळी उपस्थित होते. यावेळी कोव्हीड -१९ च्या त्रिसुत्री नियमांचे उल्लंघन केल्याने विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके सुरु असतांना अचानक पोलीसांनी छापा टाकुन विवाह सोहळा थांबवला.
ठळक मुद्देब्राम्हणवाडे : वधु पित्या विरुध्द त्र्यंबक पोलिसत गुन्हा दाखल