नाशिक : शहर गुन्हे शाखा व पंचवटी पोलिसांनी शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) छापामारी करून अठरा जुगा-यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.६) दुपारी छापा टाकला़ यावेळी संशयित मधुकर जाधव (रा. गंगापूर गाव), दादा घोडेराव (रा. शहा, ता. सिन्नर), नंदू गुंबाडे (रा. महात्मा फुले सरकारी वसाहत), धर्मा उज्जैनवाला, मिलिंद भडांगे (रा़ भद्रकाली), अन्वर शेख (रा. भद्रकाली) हे सहा जण पत्त्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़ या जुगा-यांकडून पोलिसांनी नऊ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त केली असून, त्यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि़५) मध्यरात्रीच्या सुमारास चिंचबनमधील गोदावरी कॉम्प्लेक्सच्या भिंतीलगत सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी छापा टाकला़ यावेळी संशयित संशयित सुखलाल कुमावत (रा. मखमलाबाद), सागर मुर्तडक (रा. वडजाई मातानगर), मुकुंद गाडेकर (रा. क्रांतिनगर), अक्षय साळुंके, सागर बडगुजर, प्रवीण कुमावत (रा़ क्रांतीनगर), योगेश बुधेला (रा. चिंचबन), निकेत शिंदे (रा. रामवाडी), निशांत दोंदे (रा. दरी-मातोरी) हे जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटीतील खैरे मळ्यातील चक्रधरनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी गुरुवारी (दि़६) दुपारी छापा टाकला़ यावेळी संशयित काशीनाथ निमसे (रा. नांदूर), संतोष खैरे (रा. खैरे मळा) व कैलास तांदळे (रा. निलगिरी बाग) हे जुगार खेळत होते़ पोलिसांनी या तिघांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले असून पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़