नाशिक : शहर आयुक्तालयाच्या परिमंडळ २ मध्ये अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आले असून, अचानक तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अवैध दारूविक्री व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.२०) सातपूर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी अवैध दारूविक्र ी व जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली. इंदिरानगर पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापा टाकत तीन जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ९३० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित रामचंद्र पुंडलिक गावित (२७, रा. वडाळा), निसार मोहम्मद शाह (५०, रा. वडाळा), कुंदन खंडू जाधव (३७, रा. भारतनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिकरोड पोलिसांनी अवैध दारूविक्र ी करणारे नाना दामू अहिरे (५२, रा. देवळालीगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.सातपूर पोलिसांनी अवैध दारूविक्र ीच्या अड्ड्यावर छापा टाकत संशयित आरोपी अनिल रामदास चव्हाण (रा. सातपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ८८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या लक्ष्मण शालिक भंगाळे (४८, रा. सातपूर), राजेंद्र अशोक गांगुर्डे (२८, रा. सातपूर), विलास भिला हटक (३८, रा. आनंदवली) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणाºया तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजेश वसंत पवार (४४, रा. भगूर), सुनील घनशाम जाधव (५०, रा. जेलरोड), ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड (६८, रा. भगूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.तसेच पोलिसांनी ३४९ वाहनांवर नियमबाह्य वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली असून ९५ हजार ९०० रुपयांची तडजोड दंड वसूल केला आहे. तसेच जुगार, नशाबंदीची कारवाईदेखील अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.लहान मासे गळालापरिमंडळ-२ मधील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, सातपूर, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री, जुगार अड्ड्यांची कमी नाही. पोलिसांनी अचानकपणे धाडसत्र सुरू केले असले तरी या धाडसत्राच्या प्रारंभी केवळ लहान मासे गळाला लागल्याचे दिसते. मोठे जुगार, क्लब, दारू धंदेचालकांना या कारवाईतून अभय दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अवैध दारूविक्री, जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:31 AM