नाशिक : नामांकित कंपन्यांच्या मोबाइलच्या बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या महात्मा गांधीरोडसह शहरातील विविध ठिकाणच्या मोबाइल दुकानावर औरंगाबाद येथील कंपनीच्या पथकाने सोमवारी (दि़१६) छापे टाकले़ यामध्ये अॅपल आयफोनसह बिट््स कंपनीच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या बनावट वस्तूही या पथकाने जप्त केल्या असून, चार विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा ठाण्यात कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांच्या दुकानातून औरंगाबाद येथील पथकाने सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा बनावट साठा जप्त केला आहे़ याप्रकरणी अॅपल प्रतिनिधी कुणाल खरात यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुकानमालकांविरोधात कॉपीराइट अॅक्ट ६३ व ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
एमजी रोडवरील मोबाइल दुकानांवर पोलिसांचे छापे
By admin | Published: January 18, 2017 12:41 AM