कसबे-सुकेणे : शालेय विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता आपल्या जवळच्या कसबे-सुकेणे किंवा ओझर पोलीस ठाण्याशी संपर्कसाधावा. शालेय मुलींसाठी महिला पोलिसांचे पथक सदैव तत्पर असल्याची ग्वाही ओझर पोलीस ठाण्याचे पी. आय. भगवान मथुरे यांनी दिली.मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात पोलीस रेझिंग डे सप्ताहांतर्गतबोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंदा शिंदे होते. मथुरे म्हणाले की, दि. २ ते ८ जानेवारी पोलीस रेझिंग डे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असून, त्याची सुरुवात पोलीस स्थापना दिनापासून (दि.२) सुरू आहे. या सप्ताहांतर्गत पोलीस ठाण्याच्या वतीने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून महिला, मुली, मुले, ज्येष्ठ नागरिक या सर्वच घटकांसाठी पोलिसांचे कर्तव्य काय आहे, या सर्वच घटकांनी पोलिसांना आपले दुश्मन न मानता मित्र मानावे, पोलिसांशी जवळीक वाढवावी हा या सप्ताहाचा हेतू असून, आपल्या जवळपास किंवाघरात आपल्यावर अन्याय होत असेल किंवा आपल्या कुटुंबीयांना कोणाचा त्रास होत असेल तर ओझर पोलीस ठाण्याला कोणतीही भीती न बाळगता एक फोन करावा, पोलीस सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील अशी ग्वाहीही मथुरे यांनी दिली. यावेळी पोलिसांच्या वतीने आणलेली एसएलआर रायफल, कार्बन मशीन गन, शॉट गन रायफल ही उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना दाखविण्यात आली.यावेळी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आहेर, पोलीस नाईक रामदास घुमरे, ए. एस. आय. बोरसे, भास्कर पवार, ताराचंद चौरे, अनुपम जाधव, नितीन करंडे, ससाणे, शेख, सुनीता नलावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा शिंदे यांनी, तर आभार अनिल उगले यांनी मानले.
मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:33 PM
शालेय विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न बाळगता आपल्या जवळच्या कसबे-सुकेणे किंवा ओझर पोलीस ठाण्याशी संपर्कसाधावा. शालेय मुलींसाठी महिला पोलिसांचे पथक सदैव तत्पर असल्याची ग्वाही ओझर पोलीस ठाण्याचे पी. आय. भगवान मथुरे यांनी दिली.
ठळक मुद्देभगवान मथुरे : सुकेणेला ‘पोलीस रेझिंग डे’