१५२४ उमेदवारांची हजेरीनाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाईपदांच्या भरतीप्रक्रियेस बुधवारपासून (दि़ २२) सुरुवात झाली़ शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७ तर ग्रामीण पोलीस दलातील रिक्त ७२ जागांसाठी ही भरतीप्रक्रिया होते आहे़ दरम्यान, शहर व ग्रामीणमध्ये पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या २ हजार १६९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ६४५ उमेदवारांनी दांडी मारली तर १ हजार ३६१ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत़शहर पोलीस भरती ही पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तर ग्रामीण पोलीस भरतीप्रक्रिया ही आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटे पाच वाजेपासून सुरू झाली़ शहर पोलीस आयुक्तालयात शिपाईपदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७ जागांसाठी १४ हजार २२० तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाईपदाच्या रिक्त ७२ जागांसाठी ११ हजार २९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भरतीप्रक्रियेसाठी पहिल्या दिवशी ९६९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ६९७ उमेदवार हजर झाले तर २७२ उमेदवारांनी दांडी मारली़ हजर उमेदवारांमध्ये ६४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले तर ५४ उमेदवार अपात्र ठरले़ तर आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर पहिल्या दिवशी १ हजार २०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ८२७ उमेदवार हजर झाले तर ३७३ उमेदवारांनी दांडी मारली़ हजर उमेदवारांपैकी १०२ उमेदवार अपात्र ठरले, तर ७ उमेदवारांनी माघार घेतली़
पोलीस भरती : ६४५ उमेदवारांची दांडी ; १३६१ उमेदवार पात्र
By admin | Published: March 23, 2017 1:22 AM