शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पोलीसपाटील भरतीची ‘मॅट’कडून दखल

By admin | Published: September 02, 2016 12:26 AM

प्रशासन बेजार : कायदा सादर करण्याचे आदेश

नाशिक : नातेवाइकावर गुन्हा दाखल असल्यास त्याचा अर्थ संबंधित व्यक्ती ही गुन्हेगारच आहे, असे समजून त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा कायदा आहे का? असल्यास तो सादर करा असे निर्देश ‘मॅट’ने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पोलीसपाटील भरती प्रकरणी झालेल्या गोंधळाबद्दल मीना कुंभार्डे या अन्यायग्रस्त उमेदवाराने दाखल केलेल्या दाव्याची सध्या सुनावणी सुरू आहे. सिन्नर व निफाड तालुक्यासाठी राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील भरतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येऊनही प्रशासनाने याप्रकरणी घेतलेली भूमिका संशयास्पद असल्याच्या कारणावरून जवळपास नऊ उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. मीना कुंभार्डे या सिन्नर तालुक्यातील नांदुर्डी येथील महिलेला पोलीसपाटील भरतीच्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले, परंतु मौखिक मुलाखतीत प्रांत अधिकाऱ्याने मुद्दामहून डावलले व कुंभार्डे यांच्याऐवजी आशा निकम या महिलेची निवड केली होती. कुंभार्डे यांनी याप्रकरणी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागविली असता, कुंभार्डे यांच्या माहेरच्या व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस दप्तरी असल्यामुळे मीना कुंभार्डे यादेखील गुन्हेगार प्रवृत्तीच्या असल्याचा निष्कर्ष काढून प्रांत अधिकाऱ्याने त्यांची नियुक्ती नाकारली होती. कुंभार्डे यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देऊन त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती मागविली असता, त्यांच्याविरुद्ध कोणताच गुन्हा नसल्याचे पत्र पोलिसांनी दिले होते. याचाच अर्थ निफाड प्रांत अधिकाऱ्याने जाणीपूर्वक काहीतरी हेतू ठेवून कुंभार्डे यांना नाकारतानाच, आशा निकम यांची निवड केल्याची बाब ‘मॅट’ला पटवून देण्यासाठी दावा दाखल केला आहे.