नाशिक : गुटखा अन् मटका मुक्त उत्तर महाराष्ट्र अभियान राबविण्याचे आदेशा नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाला विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडून देण्यात आले आहे. याअंतर्गत मागील तीन महिन्यांत पाच जिल्ह्यांत ८३ संशयित आरोपींना गजाआड करत पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची गुटख्याची होणारी तस्करी रोखली आहे.राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानासुध्दा चोरट्या मार्गाने गुटख्याचा पुरवठा व विक्री सुरुच असल्याने तरुणाईचे आरोग्य धोक्यात आले आहे. बंदीचा नियम केवळ कागदावरच न राहता त्याची थेट अंमलबजावणी करत नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी आपआपल्या हद्दीत चोरट्या मार्गाने येणाऱ्या गुटख्याच्या पुरवठ्यावर ह्यब्रेकह्ण लावण्यासाठी सापळे रचले. नाशिक, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रत्येकी १९ तर अहमदनगरमध्ये १२, धुळे आणि नंदुरबारमध्ये ५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. अवैधरित्या गुटखा, सुगंधी तंबाखु, पानमसाला, मावा यांसारख्या तंबाखुजन्य पदार्थांची होणारी चोरटी वाहतुक रोखण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.
८३ संशयितांना बेड्या :गुटखा-मटका मुक्त उत्तर महाराष्ट्रासाठी पोलीस सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 7:52 PM
पोलिसांनी या कारवायांमध्ये एकुण ३ कोटी ४८ लाख १४ हजार ४९० रुपयांचा गुटखा तसेच दुचाकी, चारचाकींसारखे नऊ वाहने जप्त केली आहेत. या पाचही जिल्ह्यांत चोरी-छुप्या पध्दतीने ग्रामीण भागात होणारी गुटख्याची विक्री पुर्णपणे थांबवून गुटखा मुक्त उत्तर महाराष्ट्र करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे.
ठळक मुद्देकोट्यवधींच्या गुटख्याच्या तस्करीला चाप