नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकातील ह्यस्निफर स्पाइकह्ण हे श्वान पेट्रोल बॉम्ब शोधक म्हणून प्रसिद्ध होते. स्पाइकह्णचे वयोमान आणि त्याने पूर्ण केलेली ११ वर्षांची प्रदीर्घ सेवा लक्षात घेता बीडीडीएस पथकाने या आपल्या प्रिय साथीदाराला सन्मानाने सेवानिवृत्त केले. सजविलेल्या पोलीस वाहनाच्या बोनेटवर बसवून लाडक्या स्पाइकला छोटेखानी मिरवत पोलिसांनी ह्यसॅल्यूटह्ण केला. तसेच त्याच्या वाढदिवसानिमत्त केकदेखील कापण्यात आला.नाशिक बॉम्बशोधक-नाशक पथकात २०१०साली तीन महिन्यांचे लॅब्रोडोर जातीचे हे प्रशिक्षित श्वान दाखल झाले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये स्पाइकचे वयोमान आणि सेवाकालावधी लक्षात घेता त्यास पोलीस सेवेतून मंगळवारी (दि.२३) सेवानिवृत्त करण्यात आले.छुप्या घातक स्फोटकसदृश वस्तू शोधण्यात तरबेज असलेल्या ह्यस्पाइकह्णने २०१५-१६साली नाशकात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी सुरक्षिततेच्यादृष्टीने रामकुंड, तपोवन, साधुग्राम या भागात पोलीस कर्मचाऱ्यांसह अहोरात्र सेवा बजावली. तत्पूर्वी २०१३-१४साली राजीव गांधी भवनसमोरील एका व्यापारी संकुलात एका अज्ञाताने ठेवलेला पेट्रोल बॉम्ब याच स्पाइकने शोधून काढला होता. तेव्हा तो अवघ्या तीन ते चार वर्षांचा होता. तसेच शहरातील रेल्वेस्थानक असो किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असो, अशा प्रत्येकवेळी ते ठिकाण पूर्णपणे ह्यस्पाइकह्ण पिंजून काढत होता.
काळाराम मंदिराच्या परिसरात नेहमीच या श्वानाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह हजेरी लावून परिसराची चाचपणी केली आहे. लॅब्रोडर स्पाइकला पुढील कायमस्वरूपी संगोपनाकरिता मागील दहा वर्षांपासून त्याचा संभाळ करणारे श्वान हस्तक पोलीस गणेश हिरे यांना सोपविण्यात येणार आहे. अत्यंत शांत स्वभावाचे हे श्वान इतर लॅब्रोडोर जातीच्या श्वानाप्रमाणे नाजूक नसून अत्यंत कठोर परिश्रम घेणारे कष्टाळू श्वान असल्याचे बीडीडीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सांगितले.---इन्फो--राष्ट्रपती दौरा ते मोदींच्या सभेत भूमिकाराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नाशिक दौरा असो किंवा त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवनात झालेली जाहीरसभा असो अशा या दोन्ही महत्त्वांच्या कार्यक्रमाप्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्यस्पाइकह्ण श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली होती....अन् रेल्वेच्या सुरक्षेसाठी ह्यस्पाइकह्णची धावदीड वर्षांपूर्वी एका रेल्वेत बॉम्बसदृश वस्तू असल्याचा ह्यकॉलह्ण पथकाला मिळाला होता. यावेळी इगतपुरी रेल्वेस्थानकावर संशयित एक्स्प्रेस रेल्वे गाडी थांबवून रेल्वेचा कानाकोपरा बॉम्ब शोधक नाशक पथकाने या श्वानाच्या साहाय्याने पिंजून काढला होता. सुदैवाने रेल्वेत कोठेही स्फोटकसदृश वस्तू आढळून आली नव्हती.फोटो आर वर २३डॉग१/२/३