पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी हिरावाडीतील भगवतीनगरला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून २१किलो गांजा जप्त केला. याप्रकरणात शाम दर्शन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या जगदीशसिंह जागीरसिंह संधू याला अटक केली आहे. हिरावाडीतील भगवतीनगर भागात राहणारा संधू गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर गांजा कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, नारायण गवळी, राकेश शिंदे, योगेश सस्कर, अविनाश थेटे, गोरख साबळे आदींनी भगवतीनगरला संधूच्या फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी त्याने घराच्या बेडरुममध्ये एका पितळी पंचपात्रीत गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा गांजा जप्त करून संधूवर अंमली पदार्थ कायदा कलम अन्वये कारवाई केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आडगाव शिवारात एका चारचाकी वाहनात लाखो रुपये किमतीचा बेकायदेशीर गांजा आढळून आला होता. त्यावेळी आडगाव पोलिसांनी कारवाई करून काही गांजा तस्करी करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या होत्या.
काही दिवसांपासून गांजाची सर्रास विक्री होत असल्याने नाशिक शहरात अंमली पदार्थ पुरविणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
270821\27nsk_27_27082021_13.jpg
गांजाची तस्करी करणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी अट केली.