मालेगाव : शहरातील इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले.शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठाकूरवाड यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. नजीर अहमद अब्दूल हमीद रा. अन्साररोड याने अवैधरित्या विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडर स्वत:च्या फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता साठवून ठेवलेले मिळवून आले. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण तसेच कर्मचारी अहिरे, पावरा, चव्हाण यांनी ही कारवाई केली. यात विविध कंपन्यांचे १२ घरगुती वापराचे गॅस सिलेंडर किंमत २० हजार ४०० रूपये मिळून आले. साठवणूकीबाबत गॅस सिलेंडरचा परवाना आरोपीकडे नसल्याचे आढळून आले. नजीर अहमद विरोधात गुन्हा दाखल झाला.
पोलीसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 6:42 PM