नाशिक : शहर व परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. माडसांगवीचे पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी शहरातून माडसांगवीकडे औरंगाबाद महामार्गावरुन प्रवास करताना दाखविलेल्या जागरुकतेमुळे पोलिसांच्या हाती ६४ किलो गांजा लागू शकला; मात्र गांजाची तस्करी करणारे चौघे दुचाकींवरुन फरार झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.माडसांगवी येथूननेहमीप्रमाणे गरड हे दुधविक्रीसाठी पंचवटी येथे आले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास माडसांगवी उड्डाणपुलालगतच्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला गरड यांना दोन दुचाकींवर चौघे अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या एक गोणी व हिरव्या रंगाची बॅग घेऊन उभे असल्याचे दिसले. गरड यांनी त्यांची मारुती कार बाजुला घेत त्यांना हटकले. यावेळी त्यांनी दुचाकी बाजूला करत गरड यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी गरड यांनी 'गोणी व बॅगेत काय आहे, ते खोलून दाखवा' असे सांगितले असता त्यांना दुचाकीला ह्यकिकह्ण मारत तेथून पळ काढला. एक संशयित मळे भागातील रस्त्याने येथील कारखान्याच्या पाठीमागील बाजूने दुचाकीने फरार झाला तर त्याचे अन्य तीघे साथीदार एकाच पल्सर दुचाकीने औरंगाबाद महामार्गाने शिलापूरकडे भरधाव निघून गेले. गांजाची तस्करी करणाऱ्यांनी पळ काढल्यामुळे गरड यांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार कथन करत मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक इरफान शेख हे त्यांच्या पथकासह माडसांगवीच्या दिशेने रवाना झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.--इन्फो--मळ्यात मिळाली गांजाने भरलेली बॅगमाडसांगवी शिवरातील मळे परिसरात पोलिसांनी शोधमोहिम राबविली तसेच फरार संशयितांचे व त्यांच्या दुचाकींचे वर्णन गरड यांनी सांगितल्याप्रमाणे बिनतारी संदेश यंत्रणेवरुन तत्काळ सर्व गस्तीपथकांना कळविण्यात आले. ग्रामिण पोलीस दलालाही याची माहिती दिली गेली. गुन्हे शोध पथकांनी तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना येथील मळे परिसरात एका हिरव्या रंगाची बॅग आढळून आली. बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे सहा लाख ४० हजार रुपये किंमतीचा ६४ किलो इतका गांजा आढळून आल्याचे शेख यांनी सांगितले.नाशिक : शहर व परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वारंवार प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. माडसांगवीचे पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी शहरातून माडसांगवीकडे औरंगाबाद महामार्गावरुन प्रवास करताना दाखविलेल्या जागरुकतेमुळे पोलिसांच्या हाती ६४ किलो गांजा लागू शकला; मात्र गांजाची तस्करी करणारे चौघे दुचाकींवरुन फरार झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.