जमावबंदी काळात कोणतेही काम नसताना घराबाहेर पडणे व शासकीय आदेशाच्या पालनाबाबत उदासीनता दाखविणाऱ्यांना कडक कारवाईबाबत सुचीत करु नही त्याकडे दुर्लक्ष करणाºया काही उपद्रवी घटकांना यंत्रणेने दणका दिला आहे. त्यामुळे शहरात तसेच शहराबाहेरील येणारे -जाणारे तसेच वाहनचालकही धास्तावले आहेत. जीवनावश्यक बाबी अंतर्गत येणाºया व्यापाºयांना किमान एक मीटरपेक्षा जास्त अंतरावरु न ग्राहकांना सेवा देण्याबाबत सुचित करण्यात आले असून यासाठी सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारचा आठवडे बाजार बंद असल्याच्या वेळोवेळी सूचना प्रशासनाने दिल्या होत्या त्यास प्रतिसाद मिळाला. बाजारतळात ये- जा करणाºयांना पिटाळण्यात आले. ग्रामपालीकेकडुन दिवसभर जनजागृतीसाठी भोंग्यावर सुचना देणारे वाहन फिरविण्यात येत होते. दरम्यान, वणी -सापुतारा, वणी- पिंपळगाव, वणी- नाशिक, वणी- कळवण रस्त्यावर शांतता दिसून आली.
वणीत पोलिसांकडून बंदोबस्त; ग्रामपालिकेकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:58 PM