चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कोरोना लसीकरण केंद्रावर बुधवारी रांगा लागल्या होत्या. सकाळी काही नागरिकांनी वादावादी केल्याने गर्दी नियंत्रणासाठी अखेर आरोग्य विभागाला स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून चांदवड शहर व तालुक्यांत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्र बंद होते, तर तालुक्यात १८ वयोगटाच्या पुढील लसीकरणाला प्रारंभ झाल्याने सर्वत्र गर्दी दिसून येत होती. सकाळपासून लस घेण्यासाठी गर्दी केली होती. आरोग्य विभागाकडे अवघे २५० डोस असताना रांगेत मात्र पुरुष व महिला सुमारे तीनशे ते साडेतीनशे उभे असल्याचे चित्र दिसत होते. चांदवडसह सात केंद्रांवर त्यात तळेगावरोही, भयाळे, उधरूळ, आडगाव, दुगाव, धोंडगव्हाण, चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे कोविशिल्ड लस उपलब्ध होती. प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात होते, तर दुपारी दोन वाजल्यानंतर दुसऱ्या डोसनंतर डोस शिल्लक राहिला, तर पहिल्या डोसला प्राधान्य दिल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.
चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी महिला व पुरुषांनी लावलेल्या रांगा. (०७ एमएमजी १)
070721\07nsk_14_07072021_13.jpg
०७ एमएमजी १