नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असली तरी त्यांनाही निवडणूक नियमांची माहिती असणे अपेक्षित असल्याने महाराष्ट पोलीस अकॅडमी येथे पोलीस खात्यातील कमांडो ते अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयीचे बारकावे सांगितले जाणार आहेत.निवडणूक विषयी अनुभव असलेले उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आणि प्रांताधिकारी बबन काकडे हे पोलिसांना निवडणूक कायदा आणि अधिकाराबाबत धडे देणार आहेत. येत्या १६ आणि १८ रोजी सदर प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.महाराष्ट पोलीस अकॅडमी येथे राज्य राखीव पोलीस बल प्लाटून कमांडर ते असिस्टंट कमांडट दर्जाच्या अधिकाºयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दि. १६ रोजी होणार आहे, तर पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाºयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दि. १८ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने सदर कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आनंदकर आणि काकडे हे निवडणुकीचे बारकावे समजून सांगणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता, कायेदेशीर कार्यवाही, मतदाकेंद्र प्रक्रिया, संवेदनशील मतदानकेंद्रे आणि तेथील कार्यवाही, प्रत्यक्ष निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशीची भूमिका, संशयास्पद हालचाली, पैशांचा वापर या संदर्भातील कायद्यातील तरतूद आणि अधिकार याविषयची माहिती पोलिसांना दिली जाणार आहे.
पोलिसांना मिळणार निवडणुकीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:28 AM