लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.द्राक्ष, कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेकदा शेतकºयांची परराज्यांतून लिलावासाठी आलेल्या व्यापाºयांकडून आर्थिक फसवणूक केली जाते. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये घडल्या आहेत. यामुळे पोलिसांनी सजग होऊन यंदा पोलीसपाटील व बाजार समित्यांकडून अशा बाहेरगावांहून येणाºया व्यापाºयांची माहिती मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यंदा परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा शेतमालाला बसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम तोंडावर आला असून, कुठल्याही प्रकारे बनावट व्यापाºयांकडून शेतकºयांची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून लवकरच बाहेरगावाहून आलेल्या व्यापाºयांची माहिती संकलित करून त्यांची पडताळणी सुरू क रणार असल्याचे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आठवडाभरात माहिती नमुना अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांमार्फत पोलीसपाटील व महत्त्वाच्या बाजार समित्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नमुन्यात बाहेरगावांसह परराज्यांतून शेतमाल खरेदीसाठी आलेल्या व्यापाºयांची योग्य ती माहिती भरून पोलीस ठाण्यात जमा करणे अनिवार्य राहणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस संबंधित व्यापाºयांची पार्श्वभूमी तपासणार असून, गुन्हेगारी स्वरूपाची वृत्ती असलेल्या व्यापाºयांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे सिंह म्हणाल्या. व्यवहाराबाबत सजग रहावेशेतकºयांनी व्यापाºयांच्या आमिषाला बळी न पडता आपला व्यवहार अधिक पारदर्शक व सजगपणे करून संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. संशयास्पद व्यापारी व त्यांचे आमिषाबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, जेणेकरून शेतकरी बांधवांची आर्थिक फसवणुकीला आळा घालणे शक्य होईल, असे आरती सिंह यांनी सांगितले. पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून परराज्यांतील शेतकºयांची माहिती पोलिसांपर्यंत देणे बंधनकारक आहे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
द्राक्ष व्यापाऱ्यांची पोलीस करणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 1:10 AM
नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देआरती सिंह : पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून मागविणार माहिती