शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविणार

By admin | Published: August 02, 2016 2:19 AM

आयुक्त : दरवर्षी १० ते २० टक्के बदल्या

 नाशिक : महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली, परंतु मोठ्या प्रमाणावर झालेली खांदेपालट आता प्रत्यक्ष कामकाजाला अडसर ठरू लागली आहे. त्यामुळेच नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी झालेल्या बदल्यांमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे ठरविले असून, बदलीविषयक धोरण निश्चित करून दरवर्षी सुमारे १० ते २० टक्के बदल्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.वर्षानुवर्षांपासून एकाच जागी भुजंगासन घालून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. पाणीकपातीच्या धोरणामुळे पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश थांबवून ठेवण्यात आले होते, परंतु गेडाम यांनी जाता-जाता सदर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्याही बदल्यांचे आदेश जारी केले. महापालिकेतील उपअभियंता संवर्गातील २९ पैकी १६, सहायक अभियंता संवर्गातील ६० पैकी ५१ तर सहायक कनिष्ठ अभियंता संवर्गातील ३९ पैकी ३३ जणांच्या बदल्या करण्यात आल्याने सर्वच विभागात ‘नवा गडी-नवा राज’ सुरू झाला. त्याचा परिणाम प्रत्यक्ष कामकाजावर होऊ लागल्याने नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे खातेप्रमुखांनी काही अनुभवी कर्मचारी-अधिकारी वर्गाची मागणी केली.