शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

भंगार बाजाराला राजकारण कलाटणीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:48 PM

दीपावली सणापूर्वीच महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस बंदोस्तात बहुचर्चित सातपूर-अंबड लिंक रोड भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित भंगार बाजार पूर्ण मोकळा केला. परंतु यानंतर या मुद्द्यावर राजकारण आणत खोडा घालण्याचे काम सुरू करून आंदोलने केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते व नगरेसवक दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत केला.

सिडको : दीपावली सणापूर्वीच महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस बंदोस्तात बहुचर्चित सातपूर-अंबड लिंक रोड भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित भंगार बाजार पूर्ण मोकळा केला. परंतु यानंतर या मुद्द्यावर राजकारण आणत खोडा घालण्याचे काम सुरू करून आंदोलने केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते व नगरेसवक दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत केला.  न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पोलीस बंदोबस्तात राबविलेल्या मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या विक्रेत्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून यात राजकारण आणले जात आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार महापालिकेने ही कारवाई केली असून, या कारवाईत व्यावसायिकांचा जप्त करण्यात आलेला कच्चा माल परत द्यावा यासाठी काही राजकीय पक्षाकडून मनपाकडे आंदोलन केली जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचेही दातीर यांनी सांगितले. मुळात अंबड व सातपूर वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व मनपा हद्दीत येत असलेल्या अनधिकृत भंगार विक्रेत्यांकडून आरोग्यास हानिकारक व अपायकारक व्यवसाय करण्यात येत होते. परप्रांतीय भंगार विक्रेत्यांंबरोबर काही गुन्हेगार प्रवत्तींनी येथे ठाण मांडलयाने याठिकाणी अवैध शस्त्रास्त्रे, हाणामाºया, खंडणी यासारख्या प्रकारांमुळे भंगार बाजार व परिसर संवेदनशील विभाग बनल्याने पोलीस यंत्रणेचीसुद्धा डोकेदुखी वाढली होती. परंतु मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी भूमिका घेतली. काही दिवसांपासून राजकारण आणले जात असल्याचा आरोपही दिलीप दातीर यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी नगरसेवक भागवत आरोटे, पंकज दातीर, गिरीश बंदावणे आदी उपस्थित होते.भंगार बाजारात घातक प्लॅस्टिक तसेच मोठ्या प्रमाणावरील भंगाराचे साठे रहिवासी विभागात बेकायदेशीरपणे ठेवण्यात येत होते. याठिकाणी रसायनाचे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक डबे, भंगार मालाचे साठे ठेवण्यात येत असल्याने विविध साथीचे आजार पसरत होते तसेच भंगार बाजारामुळे शहराच्या सौंदयालाही बाधा होत असल्याचे दातीर यांनी यावेळी सांगितले.