शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

राजकारण्यानो सावधान! राजकीय कूस बदलतेय...

By किरण अग्रवाल | Published: January 21, 2021 8:50 AM

Gram Panchayat Election: निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते.

किरण अग्रवाल

ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने पाया म्हणवणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने मतदारांची बदलती मानसिकताच अधोरेखित करून दिली आहे. गावकीचे राजकारण व तेथील भाऊबंदकीचे फॅक्टर्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, त्यात राजकीय पक्ष व भूमिकांचा तितकासा संबंध नसतो हे खरेच; पण तसे असले तरी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या नवोदितांवरील विश्वासाचे जे एक कॉमन सूत्र यात आढळून येते ते आशा उंचावणारेच म्हणता यावे. कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही मतदानासाठी दिसून आलेला उत्साह व त्यानंतर लागलेले निकाल बारकाईने बघितले तर त्यातून बदलाचे संकेत घेता यावेत. पारंपरिकपणे मळलेल्या वाटेवरून न जाता राजकीय बड्यांना धक्के देत विकासाच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ शकणाऱ्या शिकल्या-सवरल्या होतकरू तरुणांना अनेक ठिकाणी मतदारांनी संधी दिल्याचे व परिवर्तन घडविल्याचे पाहता राजकारणातील स्वच्छताकरणाचा प्रारंभ ग्रामपालिकांपासून होऊन गेल्याचे म्हणता यावे.निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत, की विधानसभा व लोकसभेच्या, त्यात अनेक ठिकाणी घटणाऱ्या मतदानाचा टक्का हा अलीकडे चिंतेचा विषय बनला आहे. कोणीही निवडून येवो, सारे एकाच माळेचे मणी असतात असाच अनुभव अधिकतर येऊ लागल्याने लोक मतदानासाठी न जाता त्यादिवशी पर्यटनास निघून जातात असेही पहावयास मिळते. राजकारणावरील विश्वास डळमळत चालल्याचे हे चित्र आहे. निवडणूक लढणारे राजकीय पक्ष व उमेदवारांकडून त्या-त्यावेळी राजकीय मशागत केली जात असताना प्रशासनाला व समाजसेवी संस्थांना मात्र जनजागरणाच्या मोहिमा राबवून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते म्हणूनच. पण याच स्थितीत अलीकडेच झालेल्या राज्यातील सुमारे बाराशेवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जागोजागी मतदारांनी रांगा लावून मतदानास गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: कोरोनाच्या महामारीचे संकट असताना त्यासंबंधीची भीती दूर सारून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव म्हणवणार्‍या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदान केले, परिणामी यंदा बहुसंख्य ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. शहरीमतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांची ही सजगता खरेच कौतुकास्पद अशीच आहे. मतदारांच्या जागरूकतेचीच ही निशाणी असून, तीच बदलाची नांदी म्हणता यावी.महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका राजकीय पक्षांतर्फे किंवा पक्ष चिन्हांवर लढल्या जात नाहीत. व्यक्ती वा नेत्यांचे राजकीय लागेबांधे बघता पक्षांना यातील विजयात आपले समाधान शोधता येते, त्या दृष्टीने या निवडणुकीतही आपल्यालाच सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्याचे दावे बहुतेक सर्वच पक्षांनी केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच भाजपचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटीलदेखील म्हणतात की, सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्या आहेत म्हणून. तेव्हा आकडे घटकाभर बाजूस ठेवूया; पण यंदा अनेक ठिकाणी वीस-वीस, पंचवीस -पंचवीस वर्षांपासूनच्या सत्ता उलथवून परिवर्तन घडल्याचे व तरुणांच्या हाती सत्ता सोपविली गेल्याचे दिसून आले हे कुणासही नाकारता येऊ नये. ज्यांचे काम चांगले आहे व जे मतदारांच्या पसंतीस खरे ठरले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळाली, मात्र अनेक ठिकाणी भल्याभल्यांना धोबीपछाड देत तरुणांकडे सूत्रे सोपविली गेलीत. नावेच घ्यायची तर भाजपचे चंद्रकांत पाटील,विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, मातब्बर नेते पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील आदींच्या प्रभावक्षेत्रात त्यांच्या समर्थकांना अपेक्षित यश लाभू शकले नाही. हेच नेते नव्हेत, तर त्या त्या ठिकाणच्या अन्य मातब्बरांनाही धक्के पचवावे लागलेत. ही धक्का देण्यामागील मानसिकता व भूमिका महत्त्वाची ठरावी.मतदारांना गृहीत धरून राजकारण करण्याचे दिवस संपलेत तसेच मतदारांना प्रलोभने देऊन आपल्याकडे वळवण्याचा फंडाही आता कामी येत नाही, इतके मतदार सजग होऊ लागले आहेत. विकासाची क्षमता कुणात आहे हे त्यांना समजू लागले आहे व त्यासाठी नवोदितांवर त्यांचा विश्वास दिसून येत आहे ही परिवर्तनाची लक्षणे ठरावीत. राजकीयदृष्ट्या विचार करता महाआघाडीचा फार्म्यूला तर कामी येताना दिसतोच; पण ग्रामीण भागात आजवर वर्चस्व राखणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बरोबरीने भाजपही आता तेथे पाय रोवू लागल्याचे या निकालात दिसून आले आहे. त्याखेरीज आतापर्यंत शहरी पक्षांची ओळख असलेल्या मनसे व आम आदमी पक्षालाही या निवडणुकीत यश लाभल्याने त्यांचा पाया विस्तारत असल्याचे स्पष्ट व्हावे. राजकारणाची कूस बदलू पहात असल्याचीच ही लक्षणे म्हणायला हवीत. मतदारराजा जसजसा सजग होईल व ऊर्जा तसेच नवी उमेद घेऊन काम करू पाहणाऱ्या तरुणांचे सत्तेतील प्रतिनिधित्व वाढत जाईल, तसतसे राजकारणातील स्वच्छताकरणाच्या प्रक्रियेला गतिमानता लाभून जाईल हाच संकेत यातून घ्यायचा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक