शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मतदार चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हाचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:56 AM

लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात शांततेत पार पडली. किरकोळ स्वरूपाच्या वादविवादाच्या तक्रारींचा अपवाद वगळात मतदान सुरळीत पार पडले. मुंबईनाका, म्हसरूळ, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हांचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर थांबविला तसेच मोटारीतून रोकड पोलिसांनी देवळालीत जप्त करून संबंधितांवर कारवाई केली.

नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात शांततेत पार पडली. किरकोळ स्वरूपाच्या वादविवादाच्या तक्रारींचा अपवाद वगळात मतदान सुरळीत पार पडले. मुंबईनाका, म्हसरूळ, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हांचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर थांबविला तसेच मोटारीतून रोकड पोलिसांनी देवळालीत जप्त करून संबंधितांवर कारवाई केली.सोमवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता शहर व परिसरातील विविध मतदान कें द्रांवर मतदानप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नाशिक मध्य मतदारसंघातील पखालरोडवरील सावित्रीबाई फुले शाळा या कें द्रापासून दोनशे मीटरपेक्षा कमी अंतरावर काही राजकीय कार्यकर्त्यांकडून गर्दी जमवून राजकीय चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मतदारांच्या हातात देताना पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित गुलजार गुलामगौर कोकणी, अलताफ बशीर पठाण, नवीद अनिस पटेल या तिघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील संशयित एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक निशाणी असलेल्या चिठ्ठ्या बुथ क्रमांक १६३ ते १६९च्या दरम्यान, दोनशे मीटरपेक्षा कमी अंतरावर उभे राहून येणाऱ्या मतदारांना सदर चिठ्ठ्या वाटप क रत होते. यावेळी पोलिसांनी या तिघा संशयितांना तत्काळ ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.दुसरी घटना वरीलप्रमाणे म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी विद्यालय केंद्राजवळ मखमलाबाद शिवारात घडली. या घटनेतही काही राजकीय कार्यकर्ते एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने निवडणूक निशाणी असलेल्या चिठ्ठ्या वाटतांना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संशयित अनिकेत प्रभाकार ढुमसे (रा. मखमलाबाद) यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अहिरे करीत आहेत.सहा हजारांची रोकड जप्तदेवळाली कॅम्प परिसरातील धोंडीरोडवरून एक संशयास्पद मोटार लोकांना पैसे वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गस्तपथकाने धोंडीरोड गाठले. यावेळी इंडिगो मोटार (एम.एच.१५बीडी८०३६) संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचार साहित्य तसेच ५९०० रुपये रोख स्वरूपात आढळून आले. याप्रकरणी संशयित आरोपी भीमा पोपट आहेर (रा.चरणवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक