नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविले असून, नव्याने दाखल होणाऱ्या या यंत्राबाबत सर्वच राजकीय पक्षांना माहिती देण्यास निवडणूक आयोग उत्सुक असले तरी राजकीय पक्षांची मात्र उदासीनता कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत एकाच राजकीय पक्षाला बहुमत मिळत असल्यामुळे सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे. यासंदर्भात न्यायालयातही दाद मागण्यात आली असून, यापुढच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी ९२४४ बॅलेट युनिट व ५४७९ कंट्रोल युनिट बंगळुरू येथून उपलब्ध करून दिले असून, स्ट्रॉँगरूममध्ये सदरची यंत्रे ठेवण्यापूर्वी ती प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष ठेवली जावी, असे आयोगाचे आदेश असल्याने गेल्या शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवडणूक शाखेने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाऊस येथे मतदान यंत्रे उतरताना हजर राहण्याची विनंती केली होती. परंतु कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड वगळता एकाही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी यावेळी हजर राहू शकला नाही.उलट सत्ताधारी पक्षाच्या एका जिल्हास्तरीय नेत्याने तर मतदान यंत्रे आहेत की भुसा भरलेल्या पेट्या असा सवाल करून निवडणूक शाखेच्या निमंत्रणाला केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानली आहे. एकीकडे मतदान यंत्रावर शंका उपस्थित करून संपूर्ण यंत्रणेला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे व दुसरीकडे यंत्रांच्या सत्यतेची माहिती जाणून घेण्याबाबत उदासीनता दाखवायची, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे.जुनी मतदान यंत्रे भंगारातराजकीय पक्षांचा ईव्हीएमवर असलेला आक्षेप पाहता तो एकप्रकारे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यासारखे असल्यामुळे त्यातून मान सोडून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आजवर वापरण्यात आलेल्या सर्व जुनी मतदान यंत्रे भंगारात काढून नवीन अद्ययावत यंत्रे तसेच त्याला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यावर आक्षेप घेत सदरच्या मतदान यंत्रांबरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप सुरू केला आहे.
राजकीय पक्षांची ईव्हीएम उदासीनता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:17 AM