महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक येथून करण्यात आली. त्यानिमित्ताने नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक शनिवारी (दि.१७) काँग्रेस कमिटीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजप फक्त ओबीसी मतांवर डोळा ठेवून आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर आंदोलन करून नौटंकी करत आहे, पण ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांकडे मागणी करण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील काळात काँग्रेसच्या मागे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नसल्याचे मतही माळी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. तर भगवान कोळेकर, संतोष रासाळकर, शहराध्यक्ष शरद आहेर, चंद्रकांत निर्वाण यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला लक्ष्मण जायभावे, हनीफ बशीर, अनिल कोठुळे, रमेश पवार, ज्ञानेश्वर काळे, उत्तमराव बडदे, अशोक लहामगे, भगवान आहेर, प्रभाकर क्षिरसागर, चारुशीला काळे, बबलू खैरे, उद्धव पवार, लक्ष्मण धोत्रे, संतू पाटील जायभावे, शांताराम लाठर, मयूर वांद्रे, यशवंत खैरनार,नंदकुमार येवलेकर, प्रवीण जेजुरकर, महेश गायकवाड, भास्कर जेजुरकर उपस्थित होते.