नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व त्या प्रमाणात शासनाकडून अपुरा मिळणारा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पाहता राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधण्यास सुरुवात केली असून, एकमेकांवर दोषारोप ठेवण्याबरोबरच या वस्तूंच्या पुरवठ्याचा श्रेयवादही आता रंगू लागला आहे. नाशिकमध्ये राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत सर्वत्र ओरड होऊ लागली असून, त्यातून रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ, दादा भुसे यांनी या साऱ्या गोष्टीस केंद्र सरकारकडून अपुरा पुरवठा होत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे म्हटले आहे, तर विरोधी पक्ष भाजपने याचे सारे खापर राज्य सरकारवर फोडले आहे. एवढ्यावरच राजकीय वाद थांबलेला नाही तर शिवसेनेने शहरात दोन ते तीन ठिकाणी कोविड सेंटर तसेच ऑक्सिजन सिलिंडर उभारून त्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असून, नाशिकला ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळावा म्हणून अन्न व औषधी प्रशासनाकडे पाठपुरावा चालविलेला असताना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षश्रेष्ठींना बरोबर घेऊन थेट मुंबईत जाऊन अन्न व औषधी प्रशासन सचिवांच्या दालनात ठिय्या मांडून रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत लेखी आश्वासन आणले आहे. राष्ट्रवादीनेही कोविड सेंटर उभारून रुग्णांची मदत सुरू केली आहे. राजकीय श्रेयवाद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी नाशिकला भेट देऊन विभागीय आयुक्तांची भेट घेऊन कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.
ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या मुद्द्यावर राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:08 AM
नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण व त्या प्रमाणात शासनाकडून अपुरा मिळणारा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पाहता राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधण्यास सुरुवात केली असून, एकमेकांवर दोषारोप ठेवण्याबरोबरच या वस्तूंच्या पुरवठ्याचा श्रेयवादही आता रंगू लागला आहे. नाशिकमध्ये राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत सर्वत्र ओरड होऊ लागली असून, त्यातून रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.
ठळक मुद्देसत्ताधारी- विरोधकांमध्ये जुंपली वस्तूंच्या पुरवठ्यात श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न