नाशिक : देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात पाच वर्षात सहा कोटींहून अधिक कामगार बेरोजगार झाले सत्ताधारी आपरे अपयश झाकण्यासाठी देशात दंगली घडविण्याचे राजकारण करीत असल्याचा घनाघाती आरोप संम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांनी केला आहे.नाशिकमध्ये रोटरी क्लबच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२०) संम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे उत्तर महाराष्ट्र शिक्षण अधिकार परिषदेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी बहूजन विकास आघाडीची भूमिका स्पष्ट करतानाच सत्ताधारी भाजपा शिवसेनेसोबतच विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली. व्यासपीठावर संम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, महासचीव प्रशांत बोराडे, परिषदेचे स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ आदि उपस्थित होते. सुजात आंबेडकर म्हणाले, देशासमोर आर्थिक मंदीचे संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपाययोजना आणि रोजगार निर्मिती शिक्षण याविषयावर न बोलता काश्मीर आणि पाकिस्तानसंबधी बोलतात. तर सत्ताधारी भाजापासह त्यांच्या सहयोगी आरएसएस सारख्या संघटना जातीय तेढ निर्माण करून तणावाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी विरोधकांवर टिका करण्यात व्यस्त आहेत. ते नाशिकमध्ये आले असताना येथील उद्योग व शेती विषयी न बोलता काश्मीरवर बोलतात, त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी काय ते बोलावे असे आव्हान दिले. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उबर ओला विषयीच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच त्या अथर्मंत्री आहेत की अनर्थर्मंत्री अशी कोटीही त्यांनी यावेळी केली. शिवसेना आणि भाजपाचा ब्रेकअप पॅचअपचा खेळ सुरू असून तो त्यांनी निवडुकांनतर खेळावा, येथे शिवसेनेचा खासदार असताना मुख्यमंत्री नाशिकला दत्तक घेतात याचा अर्थ नाशिकरांच्या लक्षात आला असल्याचे नमूद करतानाच त्यांनी महायुतीतील बेबनावावरही बोट ठेवले. मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सीटीच्या नावाने नागरिकांना दोन वर्ष मुख्य रस्त्यापासून दूर ठेवून शहराची वाट लावल्याचा हल्लाबोलही करतानाच त्यांनी बहूजन विकास आघाडीची विधानसभा निवडणुकीविषयीची भूमिकाही उपस्थिांसमोर उलगडून सांगितली.
लोकशाही वाचविण्यासाठी लढादेशात आणि राज्यात मनुवादी सरकार सत्तेत असल्याने नागरिकांवर वेशभूषा, खानपान यावर निर्बंध लादले जात असून वेगवेगळ््या धर्माच्या अंतर्गत गोष्टींमध्येही सरकार हस्तक्षेप करीत आहे. त्यामुळे येणाºया काळात देशात कोण राहणार आणि कोण जगणार याचा निर्णयही सरकारच घेईल अशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून देशातील लोकशाही वाचविण्यासाठी बहूजन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी लढा उभारला असल्याचे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारी विषयी मार्गदर्शन केले.