पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पत्र्यांचे शेड आणि व्यावसायिकांच्या टपºया अतिक्रमणच्या नावाखाली हटविल्या. बाजार समितीच्या मोकळ्या पडीत जागेत टपºया अडचणीच्या नसताना काढण्यात आल्या. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात आर्थिक संकट असताना या गरीब दुकानदार, व्यावसायिकांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.बाजार समितीतील मोकळ्या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी तसेच उघड्यावर लघुशंका करण्यासाठी केला जायचा. त्या जागेवर विविध व्यावसायिकांनी स्वत:च्या खर्चाने पत्र्याचे शेड, टपºया टाकल्या होत्या. सर्व व्यावसायिक नियमितपणे ठरल्यानुसार मासिक भाडे बाजार समितीला देत होते. त्यातून बाजार समिती उत्पन्नात वाढ झाली असे असताना अतिक्रमणाच्या नावाखाली या टपºया हटवून व्यवसाय बंद पाडले, अशी टीका माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली आहे. पेठरोड बाजार समितीत काही वर्षांपासून गाळे बांधून त्या व्यापाऱ्यांकडून भाडे वसूल केले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.बाजार समितीला जागेची कमतरता भासत असल्यास सेंट्रल वेअर हाउस २५ हजार चौरस फूट जागा शेतकरी व्यापारी हितासाठी वापरण्यास वावगे नाही. ४० ते ५० रुपये प्रति चौरस फूट भाडे बाजारभाव असलेली जमीन २९ वर्षांच्या कराराद्वारे तीन ते साडेतीन रुपये प्रति फूट भाड्याने देण्याचा निर्णय सभापती संपत सकाळे यांनी घेतला असे सांगून, बाजार समिती कार्यालयासमोर असलेल्या टपºयांना महिना एक हजार रुपये भाडे आहे. त्यांच्यावर कारवाई नाही. शेतकरी व व्यापारी हितासाठी असणारे चहा-नाष्टा, जेवण सुविधा देणाºया टपºया उठवत उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्याचा आरोप चुंभळे यांनी केला आहे.---------------------------------शिवाजी चुंभळे यांची सत्ताधाºयांवर टीका४काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांच्या आदेशान्वये बाजार समितीच्या आवारातील टपºयांचे अतिक्रमण काढण्यात आले. सदर टपºयांना तत्कालीन सभापती चुंभळे यांनी बेकायदेशीर परवानगी दिल्याने त्या काढण्यात आल्याचा आरोप केला गेला होता. त्यावरून बाजार समितीत राजकारण रंगले असतानाच शिवाजी चुंभळे यांनी या टपºयांच्या निमित्ताने सत्ताधाºयांवर टीका केली आहे.