तहसीलदार नितीन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम राबविण्यात आला. व्ही.एस. वाजे, एच.एल. येतवार, पी.के. कानडी, प्राचार्य व्ही.एस. कवडे, वाय.एम. रूपवते आदी उपस्थित होते. यावेळी भोर विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या पंधराशे विद्यार्थ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपीटी मशीनबाबत प्रतिनिधी व प्राचार्य कवडे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना या मशीनबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संबंधित मशीनद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक करून घेतले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष या मशीनची पाहणी करून अधिक माहितीही आपापल्या घरी सांगण्याचे आवाहन यावेळी केले.
भोर येथे मतदान यंत्र जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:56 PM