पंचवटी : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२९ ) पूर्व विधानसभा मतदारसंघातील आडगाव, पंचवटी गावठाण, मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर मानूर या परिसरात असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रि या शांततेत पार पडली. यावेळी युवक-युवती तसेच आबालवृद्धांनी तसेच साधू-महंत, अपंग व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मतदान केंद्र बदलल्याने मतदारांना संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी पायपीट करावी लागली त्यामुळे बहुतांशी मतदारांची गैरसोय निर्माण झाली होती.पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी गावठाण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा ओघ दिसून आला. दुपारनंतर अनेक केंद्रांवर काहीसा शुकशुकाट पसरला होता. मतदार याद्यांमध्ये पत्नीचे नाव अमृतधाम मतदान केंद्रावर तर पतीचे नाव फुलेनगर मनपा शाळेत आल्याने काही मतदारांनी संताप व्यक्त केला पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांवर असे चित्र बघायला मिळाले.दिंडोरीरोडवरील म्हसरूळ तसेच मखमलाबाद गावातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची मतदानासाठी गर्दी झालेली होती, फुलेनगर येथील महापालिकेच्या शाळेत दुपारी ३ वाजेनंतर मतदारांची संख्या वाढली हनुमानवाडी व काळाराम मंदिर परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विशेष गर्दी नसल्याचे जाणवले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांना घरपोच स्लिपा न मिळाल्याने मतदारांची काहीशी गैरसोय निर्माण झाली होती अनेक मतदारांनी मतदान बुथवर जाऊन त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेत त्यांच्याकडून भ्रमणध्वनीवर मतदान केंद्र यादीचा भाग क्र मांक मिळवून घेतला व मतदान केले कोणत्या शाळेत मतदान आहे याचा शोध घेण्यासाठी मतदारांना भर उन्हात ताटकळत राहावे लागल्याने अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.मतदानासाठी आलेल्या अंध-अपंग व्यक्तींना व आबालवृद्धांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी आणि शाळेत नेमलेल्या युवती स्वयंसेवकांनी मदत केली. तसेच वृद्ध व चालताना येणाºया नागरिकांना दुचाकीवर बसवून मतदान केंद्राबाहेर सोडले जात होते. सायंकाळी काही केंद्रांवर मतदाराच्या रांगा दिसून आल्या़म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हापंचवटीत म्हसरूळ येथे मतदान केंद्राच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष चिन्हाच्या स्लिपा वाटल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्या पलीकडे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. त्यामुळे सर्वत्र मतदान शांततेत पार पडले़४परिसरातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बळ तैनात करण्यात आल्याने परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाºया फुलेनगर येथील मतदान केंद्रावर ५ वाजेनंतर मतदारांची गर्दी झाल्याने सायंकाळी सातपर्यंत मतदान प्रक्रि या सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक पूर्व मतदारसंघात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:18 AM