नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी ४९.३३ टक्के मतदान झाले. राज्यातील ३२ केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदानप्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्रावर सर्वाधिक ७६ टक्के इतके मतदान झाले, तर सर्वात कमी २५ टक्के मतदान जळगावातील होमिओपॅथी महाविद्यालयातील केंद्रावर झाले.आरोग्य विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी गुरुवारी राज्यातील ३२ मतदान केंद्रांवर मतदान करण्यात आले. राज्यात सर्वाधिक ७६.२७ टक्के मतदान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केंद्रावर झाले. ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई (२७.४२), सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, मुंबई (४१.४७), टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई (३५.३०), आर.ए. पोतदार आयुर्वेद महाविद्यालय, वरळी (३५.७१), लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, सायन (३५.१२), एस.ए.एस.एस. योगीता डेंटल कॉलेज, रत्नागिरी (४६.१३), एरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय खारघर (४७.८८), आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे (३०.००), बी. जे. मेडिकल, पुणे (४७.००), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (६७.६२), पीडीईएस कॉलेज आॅप आयुर्वेद अँड रिसर्ज सेंटर आकुर्डी, पुणे (५३.२७), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, सांगली (७१.६२), एस. सी. मुथा आर्यांग्ल आयुर्वेद महाविद्यालय, सातारा (५३.००), राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर (६४.६०), डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (५५.२३), आयुर्वेद सेवा संघ, नाशिक (५३.४३),भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (३५.६३), चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज, जळगाव (२५.००), गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर (५६.२६), मथुराबाई भाऊसाहेब थोरात, दंत महाविद्यालय, संगमनेर (४३.३८), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद (४८.३५), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (४१.४४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर (६२.३४), स्वामी रामानंदतीर्थ मेडिकल कॉलेज, आंबेजोगाई(६२.६६), महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, सेवाग्राम, वर्धा (५६.९८), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (५३.१५), इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर (४६.८०), एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर(५२.६१), विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती (५६.००), वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ (५७.१४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला (४०.००), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया (७६.२७) याप्रमाणे केंद्र निहाय मतदान झाले.शनिवार, दि. ३० रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.